कोणतीही वास्तु ( गृहस्थ / व्यावसायिक ) विकत किंवा भाडे तत्वावर घेण्याअधी त्या शहराचे शास्त्रीय चयन करणे महत्त्वाचे आहे. काही वेळा फक्त किरकोळ पसंतीच्या आधारावर पुढील निर्णय घेणे हनिकारक ठरु शकते. त्यायोगे याची संबंधित कारणे दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रकाशित करत आहोत.
वास्तु दिशा...
सर्वसामान्यपणे स्थुल नेत्रांना आकर्षक व मनमोकळ्या दिसणाऱ्या वास्तु देश, काळ व स्थान इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ; येणाऱ्या काही महीन्यातच मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक परिणामांची शृंखला अनुभवास आणतात. क्वचितच सरासरी २% लोकांना चांगले परिणाम अनुभवास येतात पण आमच्याकडे येणाऱ्या सरासरी ५०% लोकांमधे ९८% लोकांना वास्तु बाधेचा त्रास असल्याचे दिसुन आले आहे. त्यायोगे जनहीतार्थ दिशा निर्देशनांना अनुसरुन अतिमहत्वाची व दुर्लभ माहीती प्रकाशित करत आहोत. या निवडक माहीतीचा संबंधित पीडीतांना काही अंशी नक्कीच लाभ होईल यात शंका नाही.
वास्तु दिशा व महादशा...
वास्तु पुरुष बद्दल मागेच निवडक माहीती दिल्यामुळे त्याची वेगळी ओळख आता परत करवुन देत नाही. त्यापुढे क्रमशः घराची अथवा व्यावसायिक वास्तुच्या दिशा स्थुल नेत्रांना दहा दिशा जरी भासत असल्या तरीही सुक्ष्म व पारलौकीक अनंग जगाच्या दृष्टिकोनातून त्या दिशा नसुन द्वार अथवा दरवाजे असतात. अशा दरवाजांच्या आवेशाने सर्व सत् व असत् शक्तींचे आवागमन त्या संबंधित वास्तुवर कमी आधिक प्रमाणात होत असते ज्याचे यत्किंचितही ज्ञान भौतिक जगतातील स्थुल देहधारी क्षणभंगुर जीवाला नसते.
दिशा परीणाम...
अशा द्वारांमार्फत ( कल्याणकारण / विनाशकारक ) शक्त्यांचे परीभ्रमण नियंत्रित करण्याहेतुने दत्तप्रबोधिनी तत्वाची आध्यात्मिक अंमलबजावणी करण्यात येते. त्यायोगे दिशा स्वामींचे उच्च पदस्थ स्वामीत्व संबंधित वास्तुत जागृत होऊन संबंधित द्वार अथवा लोकांमार्फत नकारात्मक उर्जेचा अनैतिक व त्रासदायक प्रवाह गृह अथवा व्यावसायिक जागेत होऊ नये याची दखल घेतली जाते.
माझ्या पाहाण्यात आलेल्या बाधीत अथवा शापीत वास्तु संबंधित समचुंबकीय तीव्रता असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वप्नात अथवा प्रत्ययात दृष्टांत देऊन स्वस्थानी ओढुन घेतात. त्यात त्या व्यक्तींचा अधिक प्रमाणात अंतच आम्ही पाहीलेला आहे. अशा प्रकारच्या सुक्ष्म वास्तु चक्रामधुन सुखरुप बचाव व्हावा याहेतुन वास्तु विकत अथवा भाडे तत्वावर घेण्याअधी अतिसतर्क राहावेत.
ज्यांना सामान्य मनुष्य दिशा संबोधतात. तेच वास्तु पुरुषाच्या दृष्टीने दशोद्वार असतात. अशा द्वारांचा आपल्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांची निवडक माहीती खालीलप्रमाणे...
पुर्व दिशा...
पुर्वाभीमुख दिशा सुक्ष्मलोकाद्वारे स्वर्गारोहणाचे मार्ग दर्शवते. पुर्व दिशा पुण्यस्मयी असल्याने पापकारक व नकारात्मक शक्त्यांचे तिथे अधिपत्य नाही. यात ईश, पर्जन्य, जय विजय, ईंन्द्र, सुर्य, सत्य भृंश यांचे आकाश तत्वाद्वारे आवागमन असते.
पश्चिम दिशा...
पश्चिमाभीमुख दिशा सुक्ष्मलोकाद्वारे पाताळमुखाचे द्वार आहे. पश्चिम दिशा पापविस्मयी असल्याने रात्रीच्या शेवटच्या प्रहारात वेताळ, दैत्य, राक्षस व उग्र शक्ती भ्रमणवेळ असते. यात पाप, शेषादी योनी, असुर, वरुण, दैत्य, कुष्माण्डआदींचे जल तत्वाद्वारे आवागमन असते.
दक्षिण दिशा...
दक्षिणाभीमुख दिशा सुक्ष्मलोकाद्वारे यमसदनाचे द्वार आहे. हे द्वार एक विलक्षण प्रकारचा मृत्यू सापळा आहे. ज्यायोगे पापकर्मरत मानवाला हे द्वार त्याच्या अस्तित्वापासुन पुष्कळ लांब आहे असे भासत असते ; या समज आधारे तो विन्मुखावस्थेत उर्वरित जीवन जगत असतो व काही वर्षात अकाल मृत्यूने मरतो. याउलट पुण्यकर्मरत मानवाला हे द्वार त्याच्या आस्तित्वाच्या अगदी जवळ असल्याचे भासते ; या समज आधारे तो नित्य अनुशासनात लीन असतो. वास्तविकतेने यमद्वार त्याच्या अस्तित्वापासुन अनंत योजने लांब असते. म्हणजेच त्याला मृत्यूचे भय नसते. यम, मृग, भृंगराज, गंधर्व, वितथ, पुषा, कालादींचे अग्नितत्वाद्वारे आवागमन असते.
उत्तर दिशा...
उत्तराभीमुख दिशा सुक्ष्मलोकाद्वारे योगी, सिद्ध पुरुष, देव, देवी व सद्गुरु समाजाच्या आवागमनाचे द्वार आहे. प्रणवाच्या अर्ध मात्रेच्या शक्तीवलयाचे ब्रम्हांण्डीय सुक्ष्मवहन उत्तर द्वारातुन होते. कुबेर, योगी, नाग देवता, आदिति, ऋषी, महापुरुषादींचे वायु तत्वाद्वारे आवागमन असते.
नाव व शहराच्या राशी...
व्यक्तीच्या नाव राशीकडुन त्या शहराची रास २, ५, ९, १० ११वी असल्यास त्या व्यक्तीला ते शहर प्रगतीकारक असते. जर व्यक्तीचे नाव राशी कडुन त्या शहराची रास १, ३, ४,६, ७, ८ व १२ वी असल्यास ते शहर अशा व्यक्तींसाठी नुकसानदायक असते.
रास चक्र
राशी | वर्णाक्षर | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मेष | चू | चे | चो | ला | ली | लू | ले | लो | आ |
वृष | इ | उ | ए | ओ | वा | वी | वू | वे | वो |
मिथुन | का | की | कू | घ | ड | छ | के | को | हा |
कर्क | ही | हू | हे | हो | डा | डी | डू | डे | डो |
सिंह | मा | मी | मू | मे | मो | टा | टी | टू | टे |
कन्या | टो | पा | पी | पू | ष | ण | ठ | पे | पो |
तुला | रा | री | रु | रे | रो | ता | ती | तू | ते |
वृश्चिक | तो | ना | नी | नू | ने | नो | या | यी | यू |
धनु | ये | यो | भा | भी | भू | धा | फा | दा | भे |
मकर | भो | जा | जी | खी | खू | खे | खो | गा | गी |
कुम्भ | गू | गे | गो | सा | सी | सू | से | सो | दा |
मीन | दी | दू | थ | झ | ञ | दे | दी | चा | ची |
संपर्क : श्री. कुलदीप निकम
( Dattaprabodhinee Author )
भ्रमणध्वनी : +91 9619011227
( Whatsapp Or Sms Only )
( Whatsapp Or Sms Only )
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
योग साधना विशेष संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
देवी उपासना संबंधित पोस्टस्
पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्
योग साधना विशेष संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
देवी उपासना संबंधित पोस्टस्
पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227
0 Comments