कोणतीही वास्तु उभारणीच्या पुर्वी संबंधित जागेची पाया भरणी समयी विट स्थापित केली जाते त्यास शिलान्यास ( शिळान्यास ) म्हणतात.
शिलान्यासामागील तत्व
काही ५० ते ७० वर्षांपुर्वी वास्तु उभारणीहेतु विटा, सिमेँट ब्लाँकस् शिलान्यासासाठी वगैरे अस्तित्वात नसत. त्यावेळी काळ्या पाषाणाचा वापर न्यासादी कर्मे करण्यासाठी केला जात असे. त्याकाळात भारत वर्षाततरी प्रत्येक पंचक्रोशीत एक महापुरुष अथवा राखणदाराची सुक्ष्म दैवी व्यवस्था अस्तित्वात होती. त्या क्षेत्रातील त्या महापुरुषांचे पाषाणयुक्त शिळेच्याच माध्यमातून पुजन केले जात असे. काही ठिकाणी हेच महापुरुष ; दैत्य, वेताळ, सिद्ध नाथपुरुष, मुंजोबा, भैरवनाथ, मारुती आणि भगवान शंकराच्यास्वरुपात भजले जात असत.
अशा पाषाणयुक्त महापुरुषांच्या शिळेसोबत त्या क्षेत्रातील नवीन बांधकाम होणाऱ्या वास्तु पायाभरणी शिळेसोबत जोडले जाऊन ; महापुरुषांचे त्यात आवाहन केले जात असे. त्यायोगे संबंधित वास्तुपुरुषास चैतन्यावस्था प्राप्त करुन दिल्यास त्या वास्तुवर शाश्वत वास्तु दैत्याची तथास्तुरुपात कृपा होत असे.
अशा वास्तुच्याशिळेचा त्या घरातील कुलदैवत व ग्रामदैवतेशी संबंध प्रस्थापित करुन त्या वास्तुत स्थानबद्ध असलेल्या व्यक्तींचा मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक फायदा मोठ्या प्रमाणात होतो. आज अशी वास्तु विनियोगाची व्यवस्था कोणत्याही वास्तु तज्ञाकडे अस्तित्वात नाही. दत्तप्रबोधिनी तत्वाद्वारे सुक्ष्म अनुसंधानाच्या माध्यमातूनच वास्तु शिळेचा संबंधित पारलौकीक शक्तींशी संबंध घडवुन आणला जातो.
वास्तु पाया भरणीहेतु खोदकाम कसे करावे ?
पाया किती, कसा व केव्हा खोदावा ; याचे वास्तु अधोरेखीत नियम पालन होणे आवश्यक आहे. संबंधित जागेवर खोदकाम करण्यापुर्वी त्या जागेच्या राखणदार, ग्रहस्वामी व वास्तु पुरुषाच्या योग चरणाद्वारे पुर्वानुग्रह करुनच कार्यारंभ करावा.
घराच्या भरणीविषयी दिशानिर्देशने
ग्रहारंभाच्या दिवशी सुर्य ज्या राशीवर असेल ; त्या अनुशंघाने राहु मुख आणि शेपुटाचे ज्ञानाद्वारे राहु मुखाकडुन पृष्ठावर्ती दिशेकडुन घराचा पाया खोदायला सुरवात करावी.
जर सुर्य सिंह, तुळ, कन्या राशीत असल्यास राहुचे मुखे ईशान्य व शेपुट नैऋत्य कोणात असणार.
- जर सुर्य मकर, वृश्चिक व धनु राशींत असल्यास राहु मुख वायव्य व शेपुट आग्नेय कोणात असणार.
- जर सुर्य मेष, कुम्भ व मीन राशीत असल्यास राहु मुख नैऋत्य व शेपुट ईशान्य कोणात असेल.
- सुर्य जर वृषभ, कर्क व मिथुन राशीत असल्यास राहु मुख आग्नेय व शेपुट वायव्य कोणात असणार.
- राहु मुख वायव्येला असल्यावर पाया खोदकाम व वास्तु शिलान्यास ईशान्य कोणातच केले पाहीजे.
- राहु मुख नैऋत्येला असल्यावर पाया खोदकाम व वास्तु शिलान्यास वायव्य कोणातच केले पाहीजे.
- राहु मुख आग्नेयला असल्यावरच पाया खोदकाम व वास्तु शिलान्यास नैऋत्य कोणातच केले पाहीजे.
- पाया खोदकाम व वास्तु शिलान्यास राहु मुखाच्या पृष्ठावर्ती दिशेकडुनच केले पाहीजे.
देवालयाच्या भरणीविषयी दिशानिर्देशने
जो मुहुर्त देवालयासाठी योजला आहे ; त्या दिवशी सुर्य ज्या राशीत असेल, त्यायोगे राहु मुख व शेपुटाचे अध्ययन करावं. राहु मुखाकडुन पृष्ठवर्ती दिशेकडून पाया खनन व वास्तु शिळान्यासाचे नियोजन करावेत.
सुर्य जर मेष, वृषभ, मीन राशीत असल्यास राहु मुख ईशान्य व शेपुट नैऋत्य कोणात असणार. अशा वेळी पाया खोदकाम व शिळान्यास आग्नेय कोणाद्वारे करावा.
सुर्य जर मिथुन, कर्क व सिंह राशीत असल्यास राहु मुख वायव्य व शेपुट आग्नेय कोणात असणार. अशा वेळी पाया खोदकाम व शिळान्यास ईशान्य कोणाद्वारे करावा.
सुर्य जर कन्या, तुळ व वृश्चिक राशीत असल्यास राहु मुख नैऋत्य व शेपुट ईशान्य कोणात असणार. अशा वेळी पाया खोदकाम व शिळान्यास वायव्य कोणाद्वारे करावा.
सुर्य जर धनु, मकर व कुंभ राशीत असल्यास राहु मुख आग्नेय व शेपुट वायव्य कोणात असणार. अशा वेळी पाया खोदकाम व शिळान्यास नैऋत्य कोणाद्वारे करावा.
राहु मुख चक्र
वास्तु | देवालय | ग्रह | जलाशय | वास्तु |
---|---|---|---|---|
ईशान
|
मीन, मेष, वृष
|
सिंह, कन्या, तुला
|
मकर, कुम्भ, मीन
|
आग्नेय
|
वायव्य
|
मिथुन, कर्क, सिंह
|
वृश्चिक, धनु, मकर
|
मेष, वृष, मिथुन
|
ईशान
|
नैऋत्य
|
कन्या,तुला, वृश्चिक
|
कुम्भ, मीन, मेष
|
कर्क, सिंह, कन्या
|
वायव्य
|
आग्नेय
|
धनु, मकर, कुम्भ
|
वृष, मिथुन, कर्क
|
तुला, वृश्चिक, धनु
|
नैऋत्य
|
राहु मुख दिशा
|
सूर्य राशि
|
सूर्य राशि
|
सूर्य राशि
|
पृष्ठव्रर्ती दिशा
|
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
देवी उपासना संबंधित पोस्टस्
वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
देवी उपासना संबंधित पोस्टस्
वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
संपर्क : श्री. कुलदीप निकम
( Dattaprabodhinee Author )
भ्रमणध्वनी : +91 9619011227
( Whatsapp Or Sms Only )
( Whatsapp Or Sms Only )
Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
0 Comments